चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयात कोरोनाचे संकट वाढत असतांनाच लहान मुलांमध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. लहान मुलांचे या संकटापासून संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची नितांत गरज असून जिल्हयातील प्रमुख बालरोग तज्ञांचे दवाखाने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करून लहान मुलांवरील ओढवणा-या या संकटाला नियंत्रीत करण्याच्या सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना आज केल्या.
जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना अनेक रूग्णांना आॅक्सीजन ची गरज पडत आहे. परंतु वाढत्या रूग्णांमुळे अनेकांना आॅक्सीजन च्या सुविधेला मुकावे लागत आहे. दवाखान्यात कोरोना विषयक आरोग्य सेवा घेत असलेल्या ज्या रूग्णांना आॅक्सीजन ची गरज नाही अशा रूग्णांना त्वरीत गृह अलगीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून त्या रूग्णाएवजी ज्या रूग्णांना आॅक्सीजन ची नितांत गरज आहे अशा रूग्णांना त्वरीत दवाखान्यात दाखल करून घ्यावे अशा महत्वपूर्ण सुचना सुध्दा यावेळी हंसराज अहीर यांनी केल्या आहे.