महात्मा जोतिबा फुले यांचे विचार प्रेरणा देणारे:- विशाल करंडे
सावली:- स्त्री शिक्षणा करिता प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे तसेच छत्रपतींच्या इतिहासाची जगाला माहिती देणाऱ्या सत्यशोधक समाज चळवळीचे जनक महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त आज सायखेडा येथील बौद्ध विहाराजवळ महात्मा जोतीराव फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने कमी उपस्थिती मध्ये आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी विशाल करंडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा चंद्रपुर, भागेश टेंभुर्णे आंबेडकर चळवळीचे विचारवंत, सुलोचना वाघरे ग्रा.पं.सदस्य, प्रियंका साखरे ग्रा.पं.सदस्य, मारोती मोहुर्ले ग्रा.पं.सदस्य, पुरणदास टेभुर्णे, कुंदन भैसारे, देवानंद साखरे, राष्ट्रपाल टेंभुर्णे, प्रज्ञावंत टेंभुर्णे, जयंत चौधरी, स्वप्निल वाघरे, केतन वाघरे, प्रविण वाघरे, शुभम टेंभुर्णे, आदींची प्रमुख उपस्थितीत होती.