Top News

अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्या.

विद्युत तार तुटल्याने ये-जा करणारे नागरिक अडचणीत.

ताराला विद्युत प्रवाह सुरू असेल तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता?
(सकाळच्या सुमारास चे फोटो)
 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- काल रात्रौ 10  वाजताच्या अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यातील निमनी आणि हिरापुर या गावालगत रोडवर टॉवर लाईन चे तार तुटून रस्त्यावर पडले असून ये जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास निर्माण होत आहे.पाऊस आणि हवा एवढा होता का रस्त्यावरील झाडे, घराची छपरे उडाली आणि विजेचे खांब पडले त्यामुळे विद्युत पुरवठा सकाळ पर्यंत खंडित राहिला अंधारात रात्र काढावी लागली.

निमनी आणि हिरापुर च्या मधोमध मोठी टॉवर लाईन गेली असून त्या लाईनचा तार रोडवर पडला आहे. त्यामुळे ये-जा करणारे दुचाकी, चारचाकी, जनावरे तसेच नागरिकांना त्या लाईन चा धोका निर्माण होऊन राहिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत तार बाजूला करण्यात यावा अशी विनंती नागरिक करीत आहे.

(रात्रौच्या सुमारास चे फोटो)
सुुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ताराला विद्युत प्रवाह सुरू असेल तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर विद्युत पुरवठा असेल तर तो तात्काळ खंडित करुन तार बाजूला करावा अशी नागरिकांना कडून मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने