पोंभुर्णा:- उत्कृष्ट पत्रकार व पत्रकार संघाचे विविध पद भूषविलेले आमचे सहकारी स्वर्गीय जवाहरलाल धोंडरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते मात्र पत्रकार, संपादक नव्हते. ते एक लिजंड होते. त्यांच्या पत्रकारितेला आदर्श म्हणून पाहिलं जातं. त्यांनी अनेक अशा बातम्या केल्या की ज्यांचे पडसाद जिल्हा स्तरावर उमटले. तालुक्यातील अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या सोबत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पत्रकारितेतून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या काळात त्याची अधिक आवश्यकता आहे.
स्वर्गीय जवाहरलाल धोंडरे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय होते. दैनिक सकाळचे ते तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. सकाळ वृत्तपत्र समूहाने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
त्यांच्यासाठी त्यांच्या वर्तमानपत्राची विश्वसनीयता सर्वात महत्त्वाची होती. त्यांनी कधीही सनसनाटी होईल अशा बातम्यांना महत्त्व दिलं नाही. त्यांचा या गोष्टीवर विश्वास होता की तुमच्या वर्तमानपत्राची विश्वसनीयता असेल तर बातम्या तुमच्याकडे आपोआप येतील. त्यांच्याकडे बातम्या अशा स्वरूपात येत होत्या. अशा अनेक बातम्यांचा उल्लेख करता येईल.
बातमी जवाहरलाल धोंडरे यांचेकडेकडे दिली तर काळजी करण्याचं काही कारण नाही, असा विश्वास लोकांना वाटत होता. अशा बहुआयामी पत्रकाराचं अल्प आजाराने त्यांच्या राहते घरी दुःखद निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे ते हयात असते तर त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला असता. परंतु ते आज आमच्यात नाहीत पत्रकारितेतील या महान विभूती ला विनम्र अभिवादन, व भावपूर्ण श्रद्धांजली