आनंदगुडा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटता सुटेना....

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील आनंदगुडा येथे गेल्या सहा महिन्यापासून   पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवला असून पाण्याचा प्रश्न सूटता सूटत नाही आहे.यात ग्रामप्रसाशन यांना वारंवार कळवून ही काहीच उपाय योजना  केल्या जात नसल्याने  हा सर्व प्रकार ग्रामप्रशासनच्या निष्काळजी पणाने होत आहे.ग्रामप्रशान यांना विचारले असता डिमांड निगत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असे उत्तर त्यांच्याकडून येत आहेत. गेल्या 6 महिन्यासापासून डिमांड निगत नाही कां? असा प्रश्न गावाकऱ्यांना पडत आहे.
        लिकीज पाईप लाईन मधून दर तिन दिवसाला एकदा पाणी सूटत असल्याने गावावशियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गावाकऱ्यांना शेतीचे कामे करायची की पाणी भरण्यातच पूर्ण उन्हाळा काढायचा असा ही प्रश्न निर्माण होतो आहे.पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गावाला अनेक शासकीय योजना आलेल्या असून यात 1)ठक्करबाप्पा अंतर्गत सार्वजनिक विहीर,7 लाख रुपये,

2)सार्वजनिक विहिरीवरून पाईप लाईन 10 लाख रुपये,

3)सूर्यकिरण वरील पाईप लाईन सेनिटेक्स  टाकी 10 लाख रुपये,असा अंदाजे  27 लाख रुपये निधी आला असून, एकाही योजनेचा फायदा गाववासियांना होत नसल्याने योजना फक्त्त नावापुरत्याच असल्याचे गावकरियांच म्हणणे आहे.सदर योजने अंतर्गत एक ट्रांसफॉर्मर मंजूर असून तो येता येत नाही आहे.सार्वजनिक विहिरीवरून टाकत आलेली पाईपलाईन पुंर्णपणे लिकीज असून यात पाईप हे निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत.सद्या विहिरीत पाणीच नसल्याने जवळील बोरचे पाणी किंव्हा जवळली शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी करार नाम्याअंतर्गत ग्रामपंचत च्या सामान्य फंडातुन ठरावा अंतर्गत डमपिंग करून सार्वजनिक विहिरीत सोडून उपाययोजना करणे आवश्यक असताना तसे गावाकऱ्यांनी म्हूणन न ही ग्रामपंचायत काहीही उपाययोजना करत नाही आहे.गावापासून दरी भागात 800 ते 900 मीटर अंतरावर बोरवेल असून सदर बोरवेल ला पाणी असून मध्ये मोटार टाकुण सदर बोरवेल च पाणी हे सॅनिट्टीक्स टाकीत येणे आवश्यक असताना यावर कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.सदर काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर कामाची  चौकशी करावी. यासंदर्भात मा. श्री.गटविकास अधिकारी जिवती यांना दिनांक 12/1/2021 रोजी व पं. स. सभापती जिवती यांना तक्रार केली तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांना दिनांक 19/3/2021 रोजी पाणी टंचाई आढावा बैठकित लेखी तसेच तोंडीप्रत्येक्ष भेटून तक्रार सुद्धा करण्यात आली. तसेच त्यांना फोनवर सुद्धा यासंदर्भात बोलण सुद्धा झाले.कोरोना च्या महामारीत आम्ही पाणी हा प्रश्न कोणाकडे मांडायचा आणि कोण आम्हाला न्याय देईल असा सवाल गावाकऱ्यांना पडला आहे.तरीही यावर कोणत्याही उपाययोजना झालेल्या नसल्याने गाववाशीयांनी करायच तरी काय असा प्रश्न उदभत आहे.आणि आनंदगुडा येतील पाण्याचा प्रश्न सूटता सूटत नाही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)