🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्रेमात आंधळ्या वनाधिकाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांनीच केली तक्रार. #gadchiroli #love #forests

Bhairav Diwase. April 10, 2021
गडचिरोली:- मेळघाटातील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत असताना वनविभागातील एक-एक विचित्र प्रकरणे पुढे येत आहेत. येथील सामाजिक वनीकरण विभागातील एक अधिकारी महिला वनरक्षकाच्या प्रेमात आंधळा झाल्याने स्थानांतरण होऊनही येथून हलायला तयार नव्हता. त्यांच्याबाबतची निनावी तक्रार जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना प्राप्त झाल्याने अखेर जिल्हाधिकारी सिंगला यांनीच वनविभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तक्रारीचे पत्र पाठवून या प्रेमवेड्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे. येथील वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागात वनाधिकारी असलेले हे अधिकारी वनवसाहत परिसरातील शासकीय बंगल्यात वास्तव्याला आहेत. #सकाळ

कर्करोगाने ग्रस्त असल्याने नागपूरला स्थानांतरण करण्याच्या त्यांच्या विनंतीअर्जानुसार त्यांची बदलीसुद्धा झाली. दरम्यान येथीलच एका महिला वनरक्षकाशी त्यांचे सूत जुळले. हे प्रेमप्रकरण सर्व सीमा पार करत गेले. वनवसाहतीतच या प्रेमाचे "खुल्लम खुल्ला" प्रदर्शन सुरू झाल्याने वनवसाहतीत राहणारे इतर अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले होते.

त्यापैकी कुणीतरी जिल्हाधिकारी सिंगला यांच्याकडे या प्रकाराची निनावी तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत अपर मुख्य सचिव, वने (महसूल व वनविभाग) मंत्रालय, मुंबई, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर यांना पत्र पाठवून या वनाधिकाऱ्याला गडचिरोली जिल्ह्यातून तत्काळ पदमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी बदली करण्याची शिफारस केली आहे. #सकाळ


पदमुक्तीचे आदेश काढले.....
जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून संबंधित अधिकाऱ्याच्या पदमुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांचा प्रभार सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांना दिला आहे.
किशोर मानकर,
वनसंरक्षक, गडचिरोली

बातमी संकलन:- सकाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत