जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत माराई पाटण येथे भेट

ग्राम पंचायत परिसराची स्वच्छता बघून  केले कौतुक


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:-  जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत माराई पाटण येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी अचानक भेट दिली. यावेळी अनेक बाबींचा आढावा घेण्यात आला.           
     यात जनसुविधा, समाजकल्याण, १५ वा वित्त आयोग, पेसा, व इतर योजनेतून प्रस्तावित असलेल्या पूर्ण व अपूर्ण कामाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी ग्राम पंचायत परिसराची स्वच्छता बघून कौतुक सुद्धा केले. तसेच जगामध्ये सुरू असलेल्या कोरोना या महामारी वर सुरू असलेली उपाय योजना, जनजागृती व प्रचार यांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले.   
         यावेळी उपस्थित सौ. गोदावरी केंद्रे सदस्या जिल्हा परिषद, श्री. महेश देवकते उपसभापती पंचायत समिती जिवती, श्री. सुरेश जी केंद्रे, श्री. दत्ताजी राठोड, श्री. प्रल्हादजी काळे उपसरपंच, श्री. जयप्रकाश मोहूर्ले ग्राम सेवक, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने