Top News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

पोलिसांनी आरोपीला केली तात्काळ अटक.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील आरोपी सूरज अरुण सूर्यवंशी (वय 21 वर्ष) या युवकाने घराजवळीलच मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती उघड झाली असता. चिमूर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्त असे की, खडसंगी येथील अल्पवयीन मुलगी हि आरोपी सूरज नामक व्यक्तीच्या घरी नेहमी टीव्ही पाहण्यासाठी जात होती. आरोपी सूरज सूर्यवंशी हा मिस्त्री कामावर जात होता. आरोपी सूरजचे मिस्त्री काम बंद असल्यामुळं सूरज हा घरी एकटाच होता. तेव्हा घराशेजारील अल्पवयीन मुलगी हि काल सकाळी 10 ते 11 वाजता दरम्यान सूरज सूर्यवंशी यांचे घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली असता. सूरज घरी एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत सूरज ने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली. याबाबद्द सदर मुलीने घरी रडत रडत येऊन घडलेली आप बिती आपल्या आई वडिलांना सांगितली. यावरून आई वडिलांनी चिमूर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असता. चिमूर पोलीस तात्काळ घटनास्थळी येऊन आरोपीला अटक करून कलम 376 नुसार बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. असल्याची माहिती चिमूर पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक सुनील साळवे, चिमुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बगाटे, व चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे यांच्या मार्गदर्शाना नुसार सदरची कारवाई एपीआय पूनम पाटील, एपीआय मंगेश मोहोड व पोलीस कर्मचारी यांनी सदर ची कारवाई केली असून, अधिक तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने