(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- पोवणी 2 कोळसा खाणीतील काम करत असताना एका कंत्राटी कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली असुन दुपारी 4 वाजताच्या सुमारास हा युवक पंपावर काम करत असताना तोल गेल्याने पाण्यात पडला आणि त्यातच बुडाल्याने त्याचे दुर्दैवी निधन झाले.
विशाल गणपत हंसकर रा. वरोडा हा 25 युवक मुन्ना ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार होता. त्याला पोवनी 2 ह्या कोळसा खाणीत पंपावर काम मिळाले होते. परंतु आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याचा बुडून अपघाती मृत्यु झाला.
ह्या घटनेमुळे वेकोली खाणीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन कंत्राटी तसेच कायम कामगारांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. तसेच सुरक्षा आढावा व उच्चस्तरीय चौकशी करून सुरक्षा अधिकार्यांवर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.