Top News

शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्या सह तिघांनवर गुन्हा.

आत्महत्येस करण्यास प्रवृत्त केले होते.

आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहून ठेवली चिठ्ठी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कुडेसावली येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक देवचंद धर्माजी मेश्राम यांनी 2 एप्रिल 2021 ला पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी जवळील कोट तलावात आत्महत्या केली.

       आत्महत्या करण्यापूर्वी देवचंद मेश्राम यांनी चिट्ठी लिहून त्या चिट्ठीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट व इतर यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत आहे असे लिहून ठेवले आहे. मृतकाच्या मुलाच्या तकरारीवरून चिट्ठीत नाव असलेले मुख्याध्यापक बट्टे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट, प्रदीप उपलेंचीवर व मोरेश्वर गुरनूले यांच्या विरोधात ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन मधे कलम ३०६, ३ (२), (VA )आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरनी व अनु. जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2021 रोजी अट्रॅसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढ़िल तपास ब्रम्हपूरी पोलिस करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने