Top News

नवनियुक्त ग्रामपंचायत कमेटी ने सुरू केला विकास कामाचा झंझावात.

नवनियुक्त लोकप्रतिनिधी ठरत आहेत विकासाचे अग्रदूत.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील लाडबोरी येथे चालू आर्थिक वर्ष १ एप्रिल पासून सुरुवात झाली.व नवनियुक्त ग्रामपंचायत मध्ये विराजमान झालेल्या ग्रामपंचायत कमेटी ने विकास कामे करण्यास दणक्यात सुरवात केली आहे. आपल्या विकास कामाची सुरवात करताना व गावातील पैसा गावातील विकास कामावर खर्च करायचा म्हणून नवनियुक्त कमेटी ने सर्वधर्म समभाव करीत ग्रामपंचायत सामान्य फंडातून १५% योजनेअंतर्गत गावातील बौध्द समाज, माना समाज, व गोंड समाज यांना मोठे गंज देण्यात आले.व याचा स्वीकार तिन्ही समाजातील अध्यक्ष नी केला.

सामान्य फंड महिला व बालविकास १०% निधीतून अंगणवाडी क्रमांक १ व २ साठी नेट चटई व नॅपकिन देण्यात आल्या.अपंग निधी ५% अंतर्गत असणाऱ्या गावातील अपंगाना अनाज किट वाटप करण्यात आल्या.व गावातील नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरत आहे.योग्य नेतृत्व व सर्व लोकप्रतिनिधी चा एक मेकाला धरून गावाला विकास मार्गावर नेण्यात मोलाची भूमिका निभावतात. गावाच्या विकाससाठी कुठेही मतभेद न करता मासिक मीटिंग मध्ये लोकांचे प्रश्न निकाली काढण्यात येत आहेत.या मुळे गावातील नागरिक सुद्धा आनंदी आहेत.मागील पाच वर्षात गावात कोणत्याही प्रकारे विकास कामे दिसले नाही म्हणून या वेळेस गावातील नागरिकांनी सत्ता परिवर्तन करून विकास धारी लोकप्रतिनिधी ना निवडून दिले.गावात विकास कामे कशी केली पाहिजे हे नवनियुक्त लोकप्रतिनिधी गावात विकास कामे करून दाखवत आहेत.गावातील कोणत्याच नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर लोकप्रतिनिधी ती अडचण दूर करण्यात प्रयत्न करीत आहेत .व एक आदर्श गावाची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध प्रकारे काम करीत आहेत.गावातील नागरिकांना आत्ता तरी एखाद्या तक्रारीवर वाट बघावी लागत नाही. मागील पाच वर्षेत एखादी तक्रार दिली की तिचा ६ ते १ वर्ष कारवाई साठी वाट बघत रहावे लागत होते. हीच खंत व आपला राग मतदान करून दाखवून दिले.अनुभवी नेतृत्व व सगळ्यांना एकत्र येऊन केलेले काम गावाला कसे विकासाच्या दिशेने घेऊन जाते याचा अनुभव लाडबोरी वासिय ग्रामस्थांना होत आहे.

      या मध्ये विकास कामाचे अग्रदूत असणारे सरपंच ममता चहांदे, उपसरपंच मंगेश दडमल, सदस्य कमलाकर कामडी, मंदाबाई चौके, मंजुळाबाई उईके,नंदा नागदेवते, सुरेश नन्नावरे, लोखंडे बाई यांची योग्य रित्या साथ मिळत आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी येणाऱ्या पाच वर्षांत लाडबोरी गावाला विकासाच्या उबराठ्यावर नक्कीच पोहचवेल अशी अपेक्षा नक्कीच आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने