भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीनुसार कृषी सभापती सुनील ऊरकुडे यांचा पुढाकार.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांबाबत मागणी अर्ज केले होते परंतु सदर अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर झालेले नव्हते तयासाठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांची भेट घेऊन सदर योजना लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या अशी मागणी केली होती.
कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांसाठी अर्ज सादर केले होते,काटेरी तार,स्प्रेपंप,ताडपत्री, कॅरेट इत्यादी योजनांसाठी अर्ज सादर केले होते. यातील सर्व उपकरणे शेती उपयोगी येणार आहेत तसेच,या योजना मंजूर झाल्या नसल्यामुळे शेतकरी सदर लाभाच्या प्रतीक्षेत होते,त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकूडे यांनी कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केलेले आहे,तरी कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांचे आभार व्यक्त केले आहे.
तसेच कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क साधून मंजूर झालेल्या योजनांना लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले आहे.