Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसेवेकरीता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जिल्हाधिकारी यांना विविध सूचना.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीमधून जिल्ह्यात व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याबाबत.

जिल्ह्यातील उद्योगांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश देण्याबाबत. 


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोनाचा जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवेत व्हेन्टीलेटर कमी पडत आहे. परिणामी अनेक रुग्णांची वैद्यकीय स्थिती ढासळत आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीमधून आवश्यक असेलेले १०० बेड करीत व्हेन्टिलेर उपलब्ध करण्याच्या सूचना आज पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पत्राच्या माध्यमातून दिल्या आहेत. सदर निधीचा वापर आरोग्य, पर्यावरण, पिण्याचे पाणी, प्रदूषण नियंत्रण यावर प्राधान्याने खर्च करता येत असल्याने आज कोरोनाचे भीषण संकट समोर असतांना या संकटावर मात करण्याकरिता व्हेन्टिलेर उपलब्ध करण्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी चा वापर करावा असेही यावेळी अहीर यांनी सांगितले. 
              चंद्रपूर जिल्ह्यात अनेक उद्योगांची नांदी असून यात प्रामुख्याने सिमेंट, स्टील व पेपर उद्योग आहेत. कोरोना रुग्णांना आज ऑक्सिजन चा तुटवडा भासत असल्याने सर्व उद्योगांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात ऑक्सिजन चे प्लांट उभारून स्वउद्योग तसेच रुग्णांच्या सेवेत समर्पित करावे असे समर्पक निर्देश सर्व उद्योगांना देण्याच्या सूचना आज पूर्व केनरीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने