Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व वैद्यकीय परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सकारात्मक पाहुले उचलावी:- ABVP चंद्रपूर

Bhairav Diwase
अभाविप चे जिल्ह्याधिकारी व पालकमंत्री यांना मागणी व सूचना चे निवेदन.
Bhairav Diwase.        April 21, 2021
1) चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसंख्या निहाय  कोविड केअर सेंटर तात्काळ उभे करावे. व या ठिकाणी ऑक्सिजन  व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात यावे.

2) खाजगी व शासकीय रुग्णवाहिका यांचे शुल्क हे प्रतिकिलोमीटर प्रमाणे हे शासनाकडून निर्धारित करून जाहीर करावे. उदा. Oxygen व without oxygen प्रमाणे. व रुग्णवाहिका ची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात यावी.

3) खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड चे शुल्क हे शासन निर्धारित असावे. व यावर शासनाचे निरीक्षण असावे. तसेच  गोरगरीब रुग्णांना सवलत असावी.जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात बेबनाव शुल्क आकारले जात आहे..त्यांची भरारी पथके नेमून कठोर कारवाई करण्यात यावी.

4) रेमेडिसीवर injection चे साठा वाढवून यांचे वितरण केंद्र जिल्ह्यात वाढवावे. आणि साठेबाजारी थांबवून पारदर्शकता आणावी.

5) जिल्ह्यात सामान्य रुग्णलय व मेडिकल कॉलेज येथे CT SCAN/OMR मशीन  तात्काळ खरेदी करून कार्यान्वित करावी. खासगी व शासकीय येथील शुल्क तात्काळ निश्चित करून प्रकाशित करावे.

6) जिल्ह्यात रक्त, plasma डोनर यांची online यादी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.

7) 1 मे पासून सुरू होणाऱ्या प्राधान्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याकरिता विद्यापीठ व महाविद्यालयाला निर्देश देऊन लसीकरण पूर्ण करावे.

8) शासकीय व खासगी रुग्णालयातील शुल्क निश्चित करून तात्काळ प्रकाशित करावे.

9) या प्रकारचे निवेदन मा.जिल्हाधिकारी व मा.पालकमंत्री यांना देण्यात आले यावेळी महानगर सहमंत्री शैलेश दिंडेवार, जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, महाविद्यालय प्रमुख रोहित खेडेकर, सहप्रमुख ऋषिकेश बनकर उपस्थित होते.