महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्ह्यात व महानगरात कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय जनता पार्टी सहकार्य करेल.जिल्हा प्रशासनाने अवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्या अशी मागणी महानगर भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाला याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महानगर भाजपाच्या शिष्ठमंडळाने दिले.
महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, उपाध्यक्ष अरुण तिखे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष (महानगर) विशाल निंबाळकर, भाजयुमो उपाध्यक्ष यश बांगडे यांचा समावेश होता.
यावेळी चर्चा करतांना डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले, १एप्रिल पासून देशातील ४५ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने राज्यशासनाला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्या भागात कोरोनाचा धोका जास्त आहे, त्या भागाची ओळख करून तिथे लसीकरणाचा कार्यक्रम गतीने राबविण्याच्या सूचना आहेत.
आपल्याही महानगरात व जिल्ह्यात रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. बधितांचा शोध घेऊन त्यांचे गृह किंवा संस्थात्मक विलगिकरण कसे केले जाईल या दिशेनेही नियोजन करणे गरजेचे आहे.या ईश्वरीय-जनसेवेच्या कार्यात भारतीय जनता पार्टी सदैव जिल्हा प्रशासनांसोबत राहील.असे आश्वासन त्यांनी दिले.
चंद्रपुरात कोरोना आटोक्यात रहावा म्हणून सर्व उपाययोजना कराव्या.त्याच प्रमाणे भाजपा कडून अपेक्षित सहकार्य लेखी कळवावे अशी विनंती त्यांनी केली.