सुमठाना येथे ग्रामस्वच्छता अभियानाचा माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते शुभारंभ
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- स्वच्छ सुंदर गाव करण्यासाठी तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांना संकल्प करून,गाव व आपल्या भागातील परिसर स्वच्छ ठेण्याची काळाची गरज असल्याचे यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी बोलताना सांगितले,राजुरा तालुक्यातील सुमठाना येथे ग्रामपंचायत सुमठाना व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता मोहीम अभियानाचा शुभारंभ माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमा प्रसंगी केंद्रीय सदस्य अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अँड राजेंद्र जेणेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा विदेशकुमार गलगट, गावचे सरपंच भास्कर देवतळे, उपसरपंच सौ अरुणा ताकसांडे, पोलीस पाटील बोडगाव सौ मोनिका परसुटकर, पोलीस पाटील सुमठाना निळकंठ नगराळे, वामन देवतळे, सेवानिवृत्त शिक्षक पहानपटे सर, ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना मोहूर्ले, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर कुबडे, प्रमोद ताकसांडे, मुख्याध्यापक मठाले, नरेंद्र चहारे, राहुल लोहे,गजानन झाडे,शिक्षक सुनील सोयाम, आकाश नगराळे, अंगणवाडी सेविका सौ पूनम येरणे, सौ उषा येरणे सौ विमल लोहे, सौ. गोपिकाबाई परसुटकर, ईतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोटनाके सर यांनी केले. संचालन मठाले सर यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक वामन चौधरी यांनी केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.