महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे संकेत

लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेच?
Bhairav Diwase.      April 09, 2021
चंद्रपूर:- राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे मत ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.

TV9 marathi
👇👇👇👇👇👇👇👇👇


        आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विनंती करणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी ना. विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणण्याची शक्यता बोलून दाखविली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती नवी घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या