प्रत्येक घरावर भाजपचा झेंडा लावून स्थापना दिवस साधेपणाने साजरा करावा:- आ. सुधीर मुनगंटीवार Establishment day should be celebrated simply by putting BJP flag on every house: - Sudhir Mungantiwar

Bhairav Diwase
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम साजरे न करण्याचे आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे तसेच राज्‍यात कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता राज्‍य शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहे. यात प्रामुख्‍याने जमावबंदी लागु करण्‍यात आली आहे. या पार्श्‍वभुमीवर दि. 6 एप्रील रोजी साजरा होणारा भारतीय जनता पार्टीचा स्‍थापना दिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकत्‍यांनी अतिशय साधेपणाने साजरा करावा असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

दि. 6 एप्रिल रोजी भाजपाचा स्‍थापना दिवस साजरा करताना कोणतेही गर्दी निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करू नये. आपल्‍या घरासह भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणा-या प्रत्‍येक नागरिकाच्‍या घरावर भाजपाचा झेंडा लावावा व शुभेच्‍छा द्याव्‍या असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

 मुख्‍यमंत्र्यांनी कठोर निर्बंध तसेच शनिवार व रविवारी लॉकडाउन जाहीर करताना विरोधी पक्षाने सुध्‍दा  सहकार्याचे आवाहन केले होते. त्‍या आवाहनाला पाठिंबा देत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.