Top News

भाजपाच्या मागणीला यश; बिबी येथे कोवीड-१९ लसीकरण केंद्र सुरू.


Bhairav Diwase. April 21, 2011
कोरपना:- कोरोणाचा प्रादुर्भाव जोमात चालू असून त्यावर मात करण्याकरिता शासन, प्रशासन मोठ्या शर्तीचे काम करीत असून संपूर्ण देश्यात कोवीड-१९ लसीकरण केंद्र चालू केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात सुद्धा कोरपना, गडचांदूर, नारंडा येथे कोवीड-१९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु नांदा, बीबी, आवळपुर हे मोठे गाव असून तेथील लोकांना नारंडा किंवा गडचांदूर येथे येऊन लस घेणे फार अवघड होते. कित्येकदा लस उपलब्ध नसल्याने वापस यावे लागत होते. त्यामुळे कित्येक लोक लस घेण्यास टाळटाळ करीत होते. ही अडचण लक्षात घेता भाजपा जिल्हा सदस्य, तथा माजी पंचायत समिती कोरपना सभापती मा संजयभाऊ मुसळे व इतर यांनी मा. तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे दिनांक १४/४/२०२१ रोजी मागणी केली असता त्याची दखल घेत दिनांक २०/४/२०२१ रोजी बिबी येथे कोवीड-१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन मा डाँ. स्वप्नील टेम्भे साहेबांचे हस्ते पार पडले.

यावेळी आ. सेविका मेश्राम, आ. सेवक कोडापे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चंदनखेडे सर, व इतर कर्मचारी हजर होते. पहिल्या दिवशी 100 लोकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला. बिबी येथे कोवीड-१९ लसीकरण केंद्र चालू झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. सदरचे केंद्र चालू करण्याकरिता मा संजयभाऊ मुसळे, सतिषभाऊ उपलेंचिवार, अरविंद डोहे निलेश ताजने आदीने परिश्रम घेतल्याने त्यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने