जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

आमदार निधीतून साकारण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय रुग्णसेवेसाठी सुरु. Hospital

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आमदार स्थानिक विकास निधी व उदयोगांच्या सामाजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकार करण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय आज पासून रुग्णसेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा या रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, भद्रावती - वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले, उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नोडल अधिकारी रोहन घूगे, अप्पर पोलिस अधिक्षक अतूल कुलकर्णी, सार्वजनीक बांधकाम विभागाचे राठोड, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे विश्वजीत शाहा, जितेश कुळमेथे, कलाकार मल्लारप, अमोल शेंडे यांच्यासह येथील डॉक्टर व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
         
      चंद्रपूरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. परिणामी रुग्णांच्या तूलनेत खाटांची संख्या कमी पडत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्याण राज्याचे उपमूख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतील एक कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरात सोई सुविधा युक्त कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी  स्थानिक आमदार विकास निधीतील एक करोड रुपयांचा निधी मनपाकडे वळता केला होता.  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या रुग्णालयाला तात्काळ प्रशासकीय मान्यता देत सदर कामाची गती वेगवाण केली. दरम्याण या रुग्णालयासाठी काही स्थानिक उद्योगांनीही आपला सामाजिक दायित्वनिधी उपलब्ध करुन दिला. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर रुग्णालय लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी वेळो वेळी रुग्णालयाला भेटी देत कामाची पाहणी केली. परिणामी अतिशय विक्रमी वेळेत या रुग्णालयाचे काम पुर्ण करण्यात आले असून आज सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  सदर रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
       या रुग्णालयात एकून 115 खाटा असून यातील 100 खाटा या ऑक्सिजन युक्त आहे. त्यामूळे आता ऑक्सिजन अभावी रुग्णांची होत असलेली मोठी गैरसोय टळणार आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेत या रुग्णालयातील प्रत्येक वार्डामध्ये सिसिटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रुग्णांच्या आरोग्याची पूर्ण काळजी येथे घेतल्या जाणार आहे. येथील सर्व कामावर आमदार किशोर जोरगेवार यांचे लक्ष राहणार असून येथे तक्रार निवारण कक्षही स्थापण करण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. आमदार निधीतून साकारण्यात आलेले हे जिल्हातील पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयात येणा-या रुग्णांना सन्मानजनक वागणूक देण्यात यावी, रुग्णांच्या प्रकृतीची माहिती नातलगांना वेळो वेळी देण्यात यावी अशा सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या असून हे रुग्णालय उत्तम आरोग्य सेवेचे केंद्र बनावे  अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
विक्रमी वेळेत हे रुग्णालय सुरु केल्या बद्दल खासदार बाळू धानोरकर यांनीही आमदार किशोर जोरगेवार व प्रशासनाचे कौतूक केले आहे. 140 ते 150 खाटांची या रुग्णालयाची क्षमता असून लवकरच येथे अतिदक्षता विभागही सुरु करण्यात येणार आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होवू नये यासाठी ऑक्सिजन टॅंक बसविण्यात आली आहे.  निर्सगाच्या सानिध्यात बसलेले हे रुग्णालय लोकप्रतिनीधी व प्रशासनाच्या प्रबळ ईच्छाशक्तीचे  उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत