Top News

काँग्रेस कार्यकर्त्यांचा गावातील विकासकामांना विरोध.

नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न..


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील गावतालावचे खोलीकरण नुकतेच दालमिया सिमेंट कंपनीतर्फे करण्यात आलेले आहे. परंतु गावातील काँग्रेस कार्यकर्ते प्रदीप मालेकर यांनी गावकऱ्यांची दिशाभूल करत विकास कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी सदर तलाव हा वनविभाग अंतर्गत येत असल्याचे सांगितले परंतु वनविभागाचा वनतलाव कक्ष क्र.१९० मध्ये येत असून कंपनीतर्फे तिथे कसल्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही,तसेच गावातील सरपंच स्वतः तिथे उपस्थित असल्याचाही आरोप वनविभागाच्या १३मे ला आलेल्या पत्रानुसार लावला त्यामुळे वनविभागाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.परंतु ८ मे रोजी भवानी माता मंदीराजवळील गावतलवाचे भूमिपूजन करण्यात आले होते.आणि गावातील सर्व नागरिकसुद्धा उपस्थित होते ,त्यामुळे जी वनविभागाला माहिती दिली होती ती अत्यंत चुकीची होती त्यामुळे ग्रामपंचायत नारंडातर्फे अश्या प्रवृत्तीच्या व्यक्तीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत नारंडा यांनी १३ मे ला वनविभागाला दिलेल्या पत्रात सदर चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची चौकशी होऊन त्यावर योग्य ती कादेशीर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून भविष्यात असे कुणीही व्यक्ती विकासात्मक कामात अडथळा निर्माण करणार नाही व प्रशासनाची दिशाभूल करणार नाही.
पावसाळ्यात वनतलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वनविभागाने सदर वनतलावाची तात्काळ दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत नारंडा यांचे तर्फे करण्यात आलेली आहे.
गावतालावाचे खोलीकरण सुरू असताना कुठंतरी गावातील नागरिकांची व प्रशाशनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून विकास कामात अडथळा निर्माण करून ते काम थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.पंरतु गावातील सर्व नागरीकांच्या सहकार्याने गाव तलावाचे खोलीकरण पूर्ण झाले आहे.
   गावात काही वर्षांपासून अनेक विकासाची कामे झालेली आहेत,परंतु राजकारणाच्या सुडापोटी विकासकामे थांबविण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसत आहे.पंरतु गावातील नागरिक येणाऱ्या काळात नक्की अश्या नीच प्रवृत्तीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
     काँग्रेस कार्यकर्ते प्रदीप मालेकर म्हणण्यानुसार  जर वनतलावाचे काम रोजगार हमी योजने अंतर्गत वनतलावाचे मंजूर असल्यास ते काम आत्ता पर्यंत सुरू व्हायला पाहिजे  होते,परंतु अद्यापही कसल्याही प्रकारचे वन तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही फक्त गावातील नागरिकांची व परिसरातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.वन तलावाची  दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालांचे  नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तरी होणारी नुकसानभरपाईची किंमत काँग्रेस कार्यकर्ते प्रदीप मालेकर देणार की वनविभाग देणार  हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने