जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

सात लाखांचा मोहफूल सडवा व २ लाख २१ हजारांची दारू जप्त.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- रानमुल जंगल परिसरात नदीत माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने नदी परिसराचा शाेध घेतला असता, दारूभट्टी आढळून आली. पाेलीस आल्याची माहिती मिळताच दारू गाळणारे पळून गेले. साेबत असलेल्या पंचांनी ओळख पटविली असून त्यांची अंबादास गेडाम, कवडू गेडाम व बंडू म्हरस्काेल्हे अशी नावे आहेत. हे तिघेही मुरमाडी येथील रामभाऊ मेश्राम याच्या मदतीने दारू काढत हाेते. घटनास्थळावर ४४ ड्रममध्ये माेहफूल सडवा भरला असल्याचे आढळून आले. त्याची किंमत सात लाख रुपये हाेते. दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ३७ हजार रुपये किमतीचे साहित्य आढळून आले. ही कारवाई ७ मे राेजी करण्यात आली.

चामाेर्शीजवळ असलेल्या लालडाेंगरी बायपास मार्गावर कारमधून दारूच्या पेट्या उतरवित असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आले. पाेलीस आल्याची माहिती मिळताच आराेपी पळून गेले. घटनास्थळावरून दारूच्या २९ पेट्या आढळून आल्या. दारूची किंमत २ लाख २१ हजार ८५० रुपये एवढी हाेते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत