राजुरा तालुक्यातील मंगी (खुर्द) येथील जनावराच्या गोट्यावर पडली वीज.

Bhairav Diwase
तीन जनावरांचा मृत्यू....


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात आज सायंकाळी खूप सोसाट्याचा वारा,मेघगर्जणेसह पाऊस पडला त्यामध्ये मंगी खुर्द येथील श्री.रवीं तलांडे यांच्या जनावराच्या गोट्यावर वीज पडून एक बैल ,एक गाय आणि एक लहान वासरू मृत्यू पावले.

रवी तलांडे यांचे यात खुप नुकसान झाले एन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने आता या शेतकऱ्यांला शेती कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.या अवकाळी पावसामुळे श्री.रवीं तलांडे या शेतकऱ्यावर खूप आर्थिक संकट कोसळले आहे.तर श्री .रवी तलांडे या शेतकर्याला शासनाने आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी अशी गावकरी विनंती करीत आहे.