१०० गावकऱ्यांनी केले लसीकरण
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) ग्रामपंचयात ईमारतीत दि.१३ मे रोजी गुरुवारी कोविड लसीकरण शिबिर घेण्यात आले.
त्यात परिसरातील १०० नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले.
प्रत्येक गावात लसीकरणाची केंद्र नसल्यामुळे व सतत लसीचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीक लसीकरणापासून वंचित राहत आहे. या सर्वांना कोविड लस मिळावी व कोणीही लासीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी सदर लसीकरण शिबिर घेण्यात आले.
सदर शिबिर ४५ वर्षावरील नागरीकांसाठी आयोजित करून प्रतिसाद देत पिपरी (देशमुख), ढोरवासा, तेलवासा, कोची या गावातील नागरीकांनी आपले लसीकरण करून घेतले.
यावेळी परिचारिका कासवटे, सरपंच अर्चना नांदे, उपसरपंच पंकज खराडे, ग्रामसेवक मुकळे, ज्योती आसमपल्लीवर, सुमन खुटेमाटे, चंद्रकला खुटेमाटे, सुरेश आस्कर, हेमंत बोबडे, बंडू कामटकर आदींची उपस्थिती होती.