(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू आहे. याच महिन्यात अल्लातालाने महंम्मद पैगंबर यांच्याकडे पवित्र कुराण सुपूर्द केले होते. त्यामुळे हा पवित्र महिना मुस्लिम बांधव उत्साहात साजरा करीत असतात.
या महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर महिनाभर रोजे म्हणजेच उपवास करतात. हे रोजे ठेवणे अत्यंत कठीण असल्यामुळे प्रामुख्याने मोठे बांधव हे रोजे ठेवतात.
मात्र भद्रावती शहरातील किल्लावार्ड येथे राहणारा अयमान नफीस अहमद या ९ वर्षीय मुलाने महिनाभर रोजे ठेऊन अल्लातालाकडे कोरोनापासून भारत देशातच नव्हे तर सर्व जगाला मुक्ती मिळून सर्व व्यवहार नियमित करावे अशी दुवा केली आहे.
शहरातील नफीस कॅम्प्युटर चे संचालक नफीस अहमद यांचा अयमान हा मुलगा आहे. रोजे ठेवले असतांना सुर्योदय ते सूर्यास्तपर्यंत काहीही खायला जमत नाही. एवढेच नव्हे तर या काळात पाणी पिणेसुद्धा व्यर्ज असते. असे कठीण आव्हान लहानशा अयमानने सहज पेलून त्याने रोजे ठेवले. त्याने रोजे ठेऊन लहानग्या वयात तो इतरांसाठी आदर्श ठरला आहे. त्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.