माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पुढाकार
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील प्रा आरोग्य केंद्र मांडवा याठिकाणी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी करताच दोन दिवसाच्या आत विषाणू नाशक यंत्र उपलब्ध करून दिले.भारतीय जनता पार्टीचे कोरपना शहर अध्यक्ष अनिल कवरासे यांनी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली व त्यांच्या पुढाकाराने दोन दिवसात मागणीला यश आले दिनांक १९ ला प्रा आरोग्य केंद्र मांडवा येथे विषाणू नाशक यंत्र लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मांडवाच्या सरपंच सौ संगीता तलांडे,चनई बु.चेसरपंच अरुण मडावी,श्री अनिल कवरासे वैद्यकीय अधिकारी डॉ शालिनी तरोने,भाजयुमो तालुका महामंत्री राजुरा रवि बुरडकर,अनिल तलांडे संदीप मडावी तसेच मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विषाणू नाशक यंत्र आदिवासीं दुर्गम भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी पालकमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार,व माजी आमदार अँड संजय धोटे यांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले.