खतांच्या किंमती बाबत शेतकऱ्यांनी गैरसमज करू नये:-कृषी सभापती सुनील ऊरकडे

Bhairav Diwase
जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सध्या संपूर्ण देशात खतांचे भाव वाढले आहेत असे माध्यमातून बघायला मिळत आहे परंतु केंद्र शासनाने असा कोणताही निर्णय घेतला नसून तसा आद्यपही शासन निर्णय कृषी विभागाकडे आलेला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांच्या किंमतीबाबत कोणताही गैरसमज करू नये व खतांच्या बॅग वरची किंमत व POS मशीन वरची किंमत बघूनच कृषी केंद्र धारकांना पैसे अदा करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हयात आद्यपही खतांचा जुनाच साठा उपलब्ध असून अजुन नवीन खतांचा साठा येण्यासाठी वेळ आहे,त्यामुळे जुना खतांचा साठा हा जुन्याच किंमतीत विकावा तसे न केल्यास कृषी केंद्र धारकांवर कार्यवाही करण्यात यावी असे आदेश कृषी सभापती सुनील उरकुडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत.
तसेच खतांचे भाव हे कंपनीयांचे तर्फे अचानक वाढविले असून अद्यापही केंद्र सरकारने त्या भावाला अंतीम दिलेला नाही,तसेच याबाबत सर्व खत उत्पादक कंपनीयांच्या सोबत चर्चा सुरू असून याबाबत लवकरच सकारात्मक परिणाम दिसेल असे यावेळी कृषी सभापती सुनील उरकुडे यांनी सांगितले आहे.