(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शेतकरी वाचवा देश वाचवा, कापुस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येवुन कापुस पिकाचे 50 ते 60% नुकसान झाल नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला त्यातच कोरोनाने 2020, 2021 मध्ये कोणालाही सोडलं नाही. शेतकरी कूटुंबातील कर्ते पुरुष मरण पावले, शेतकरी संकटात सापडला. गावा गावात कोरोना आजारा आला. त्या संकटांना तोंड देऊन शेतकरी पुढील येनार्या हंगामाची वाट पाहत आहे.
त्यातच आलेली बातमी वाचली रासायनिक खताची दरवाढ शेतकरी याना चिंतेची बाब आहे. शेतकर्याच्या मानगुटीवर बसनारी रासायनिक खताची दरवाढ म्हजेच 'पुणे लुटून सातारा दान करणे' होय. खताच्या किंमती दुपटीने वाढवून करोडो रुपये कमवून शेतकऱ्यांना भिकेला लावायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांची भीक देऊन त्या भिकेला सन्मान हे नाव द्यायचे. ह्या धूर्त काव्यालाच म्हणतात 'पुणे लुटून सातारा दान करणे' यामुळे शेतकरी आत्महत्या वाढणार आहे.
शेतकर्याचा सरकारने विचार करून खताची दरवाढ थांबवावी. असे निवेदन शेतकर्याच्या वतीने आम आदमी पार्टीचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदिप बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, सचिव संतोष दोरखंडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संगठन प्रमुख परमजित सिंग झगडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. सदर मागणी पूर्ण करुन शेतकर्याना दिलासा द्यावा असे आम आदमी पार्टीचे रोशन येवले, मिलिंद गड्मवार, स्वप्निल कोहपरे, पवन ताकसांडे, अरविंद वांढरे, मारोती पूरी, गोविंद गोरे, सुनिल राठोड, प्रतिक डाखरे, ऋषी वासेकर निवेदनात म्हटले आहे.