चंद्रपुर जिल्हा शासकीय कोविड रुग्णालयासमोरील अवैध कोविड सेंटरवर धाड.

Bhairav Diwase
कुठलीही परवानगी, नोंदणी नसतांना कोरोना बाधितांवर सुरू होते उपचार.
Bhairav Diwase.          May 06, 2021

चंद्रपुर:- चंद्रपूरात मुख्य शासकीय कोविड रुग्णालयासमोर यंत्रणेच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाच्या तपासणीनंतर धाड घालण्यात आली. जिल्हास्तरीय टास्कफोर्सच्या तपासणीत याबाबत शहानिशा केली गेली. 

        MBBS पदवीधारक डॉ. शफीक शेख यांच्या या रुग्णालयावर मनपाच्या पथकाने धाड घालत कारवाई केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. शेख यांच्याकडे कुठलीही परवानगी नसताना कोवीड रुग्णांवर धडाक्यात उपचार केले जात होते. या धाडीत अवैधरित्या साठविलेली औषधे-इंजेक्शन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. 
        
      डॉ. शफीक शेख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील कोविड ICU वॉर्डात कंत्राटी सेवा देत आहेत. एकीकडे कोरोना वार्डात सेवा आणि दुसरीकडे शासकीय रुग्णालयाबाहेर उपचाराचा गोरखधंदा सुरू होता. डॉ. शेख आणि त्यांच्या रुग्णालयावर साथरोगसंकट कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.