Top News

भद्रावती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध

तहसीलदारांना निवेदन सादर


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख व तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, व जीवनावश्यक वस्तूंची केलेली दरवाढ, तसेच नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली 40% दरवाढ यांच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर नायब तहसीलदार भांदकर यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती 40% नी वाढल्या. त्यामुळे मागील एक वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. शंभर रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे, असा आरोप करत ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज धानोरकर, कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख, शहर अध्यक्ष सुनील महाले, युवक शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष परवेज अहमद, महिला शहर अध्यक्ष साबिया देवगडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने