भाजयुमोतर्फे सुरू करण्यात आलेल्या १४ आरोग्य मार्गदर्शन केंद्रांचे प्रातिनिधिक उद्घाटन संपन्न. Chandrapur

Bhairav Diwase
आरोग्य मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून जनसेवेच्या कार्यासाठी नेहमी तत्पर राहुन हे ईश्वरीय कार्य पूर्ण करा:- आ. सुधीर मुनगंटीवार
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान, युगपुरुष, श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्पित राष्ट्रसेवेस कार्यमग्न असणार्‍या केंद्र सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असल्याने राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख,मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्यक्रमाचे मोठ्या संख्येत आयोजन करण्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाच्या वतीने जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या १४ आरोग्य मार्गदर्शन केंद्राचे प्रातिनिधिक उद्घाटन मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभहस्ते दुपारी ०१:३० वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून पार पडले. लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या मार्गदर्शन केंद्रात कोरोना, म्युकरमायकोसिस, कोवीड लसीकरण, तसेच अन्य कोणत्याही आरोग्य विषयक समस्येवर मदत व योग्य माहिती युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या तालुक्यातील केंद्रावरील युवा मोर्चाचे स्थानिक पदाधिकारी फोनच्या माध्यमातून सेवा देणार आहे व त्यांचे मोबाईल नंबर DG- BJP ॲपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार संजयजी धोटे, भाजपा कामगार आघाडी प्रदेश महासचिव अजयजी दुबे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा महामंत्री विवेक बोडे, जिल्हा उपाध्यक्ष मिथलेश पांडे, तालुका अध्यक्ष अजय मस्के, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतिक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे,अनिरुद्ध भालेराव, सोशल मीडिया विधानसभा संयोजक पियुष मेश्राम, रिंकु गुप्ता त्याचबरोबर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.