जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

कवठी येथे कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात.

60 लोकांचे झाले लसीकरण.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- कोविड-19 चे रुग्ण लक्षात घेता मोठया प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. सावली तालुक्यातील कवठी येथील जिल्हा परिषद शाळा येथे लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. 45 वर्षे वरील नागरिकांना 7 ते 8 किमी. अंतरावर लस घेण्याकरिता जाण्यायेण्याची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना लस घेण्यास अडथळे निर्माण होत होते. आणि त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडे तोंडी मागणी केली होती. कवठी येथील उपकेंद्राअंतर्गत कवठी, पारडी, रुद्रापूर आणि सिंगापूर असे चार गावे येतात. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कवठी मार्फत पत्राद्वारे मागणी केली होती.

कवठी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ग्रामसेवक श्री. सांगोडकर, सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच श्री.विलास बट्टे, सदस्य कु. राकेश घोटेकार, सौ. संगीता पाल, सौ. मनीषा कोसरे, सौ. शितल गोरडवार, प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोबाडे सर, आरोग्य सहाय्यक ठीकरे सर, कावळे सर, गधेकार मँडम आरोग्य कर्मचारी आशा वर्कर सौ. संगीता गेडाम अंगणवाडी सेविका सौ. राऊत, सौ. कोसरे, बोरकुटे आदी उपस्थित होते.सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या आणि कुंटूबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आव्हान आणि कुठलीही भीती न बाळगता लस घेण्यास सभापती विजय कोरेवार आणि ग्रामपंचायत कार्यालय कवठी यांनी नागरिकांना विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत