Top News

४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे - संजय गजपुरे, जि.प.सदस्य

मिंडाळा, पाहार्णी व गोविंदपुर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आता कोविड लसीकरणाची सोय....
पहिल्याच दिवशी १०० टक्के प्रतिसाद


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:-कोविड चे वाढते रुग्ण लक्षात घेता आता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील जंगलबहुल ग्रामीण भागात मात्र अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांची अडचणी येत होत्या. नजिकच्या केंद्रावर लसीकरणाची सोय करण्याची मागणी लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जि.प.आरोग्य विभागाने आता सर्वच आरोग्य केंद्रात कोविद लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.


आज नागभीड तालुक्यातील बाळापुर (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत मिंडाळा उपकेंद्र या ठिकाणी लसीकरणाची सुरुवात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आली. तर मौशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पाहार्णी येथे नागभीड पं.स.सभापती प्रफुल्ल खापर्डे यांच्या हस्ते व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले., तालुक्यात यापूर्वी ग्रामीण रुग्णालय,नागभीड व नवेगाव पांडव , तळोधी बाळापुर , वाढोणा,मौशी, बाळापुर बुज. या आरोग्य केंद्रासह काही मोजक्या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण होत असल्याने जंगलबहुल नागभीड तालुक्यातील नागरिकांना केंद्रावर पोहचण्यासाठी अडचण येत होती. मिंडाळा येथे ग्रामपंचायत भवनात तर पाहार्णी येथे जि.प.प्राथमिक शाळेत लसीकरणाची सोय करण्यात आली होती.
मिंडाळा येथे डॉ. विजय हिवरकर व डॉ. स्वाती भोगावार तर पाहार्णी येथे डॉ. सागर माकडे व डॉ. दिनेश अथेलकर या वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केंद्र लस उपलब्धतेनुसार सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरु राहणार आहे. आज या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ११० नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. या ठिकाणी लसीकरणाला १०० टक्के उत्स्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता नियमितपणे लसीकरण केंद्र सुरु ठेवण्याची मागणी दोन्ही सरपंचांनी केली आहे.


तालुक्यातील ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांनी कुठलीही भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले व नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी या नवीन उपकेंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे सांगितले . सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्व:ताच्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची विनंती केली.
लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मिंडाळा येथे पं.स.सदस्या सौ.प्रणिता गड्डमवार, सरपंच गणेश गड्डमवार, ग्रा.पं.सदस्य व माजी उपसरपंच विनोद हजारे, पोलीस पाटील लतीश रंधये , सतीश मांदाडे, अशोक समर्थ, सिएचओ डॉ. गेडाम मँडम तर पाहार्णी येथे सरपंच सौ.मंजुषा गायकवाड मँडम, उपसरपंच पुरुषोत्तम बगमारे, माजी उपसरपंच लव्ह भाजीपाले, पोलीस पाटील सुभाष फुलबांधे,भाजपा चे तालुका महामंत्री सुनिल शिवणकर, सिएचओ डॉ. प्रियंका पिसे, बाळुभाऊ तुपट,भरत राउत , रिंकु धरड , राकेश मारबते यांच्यासह सर्व आरोग्य सेवक, कर्मचारी , आशा सेविका यांची उपस्थिती होती. दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत ने लसीकरणासाठी सर्वपरीने मदत केली होती .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने