जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🇮🇳

🇮🇳 🙏

🙏🏻

आदिवासी लोकवस्तीतील सौर ऊर्जेचा लाईट दुसरीकडे स्थलांतर. Pombhurna


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोभुर्णा तालुक्यातील अवघड क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज या ठिकाणी जिल्हा परिषद आर्थिक निधीमधून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी एक तर अनुसूचित जातींसाठी एक असे दोन सौर ऊर्जेचे दिवे देण्यात आले होते. परंतु अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी दिलेला लाईट आदिवासी लोक वस्तीत न देता किंवा बिरसा मूंडा याठिकाणी न लावता ग्रामपंचायत वार्ड मेंबरने आपल्या मर्जीने सदर लाइट दुसरीकडे स्थलांतर करुन इतर गलीत लावण्यात आल्याने आदिवासी जमातींच्या नागरीकावर एकप्रकारे अन्याय झाल्याचे समजते.

पावसाळी दिवसांत विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित होत असते. अशावेळी सौर ऊर्जेचे लाइट वरदान ठरत असते. परंतु आदिवासी लोकवस्तीत संबंधित लाइटच दुसरीकडे वळविलयाने विद्युत नसताना अंधाराचे साम्राज्य पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तेव्हा दुसरीकडे लावलेला सौर ऊर्जा लाइट आदिवासी लोकवस्तीत हलविण्यात यावा. अशा मागणीला नागरिकांमधून जोर धरल्या जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत