Top News

कोविड लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद हे जनजागृतीचे यश- संजय गजपुरे जि. प.सदस्य

पारडी ठवरे व मोहाळी (मो.) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- कोविडमुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता व सुरक्षिततेच्या दष्टीने ग्रामीण भागातील नागरिकांनी आता लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील प्रत्येकच गावात जि.प. व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच आरोग्य व महसुल विभागाच्या सहकार्याने कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे कोविद लसीकरणा बाबतीतील अनेक गैरसमज आता दुर झाले असुन नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरणाला येत असल्याची प्रतिक्रिया जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी व्यक्त केली आहे. यात आशावर्कर , आंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, ग्रा.पं. पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी यांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पारडी ठवरे या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरणाची सुरुवात पारडी-मिंडाळा-बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. पारडी ठवरे येथे जि.प.प्राथमिक शाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी यांच्या नियोजनातुन व बाळापुर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती भोगावार यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची सोय करण्यात आली होती. मोहाळी ( मो.) उपकेन्द्रात नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॅा.प्रियंका मडावी यांच्या मार्गदर्शनात लसीकरण करण्यात आले . दोन्ही ठिकाणी उपलब्ध लसीतुन १०० टक्के लसीकरण केल्या गेले.
याप्रसंगी प्रथम लसीकरण करणाऱ्या नागरिकांचे उपस्थितांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . तालुक्यातील ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले .जि.प.क्षेत्रात संजय गजपुरे यांच्या वतीने प्रत्येकच गावात मास्क व सँनिटायझेशन चे तसेच जनजागृती पत्रकांचे वाटप सुरु आहे .आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोज आता ८४ दिवसानंतर दिल्या जाणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत: च्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची विनंती केली.
लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पारडी ठवरे येथील सरपंच युवराज दोनाडे ,उपसरपंच नंदेश्वर खोब्रागडे ,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रतिराम ठवरे, ग्रामसेवक आर.बी.चौधरी ,सिएचओ डॉ. गेडाम मँडम ,उपकेंद्राचे आरोग्य सेवक सुरेश बुरम व अजय शेटे , आरोग्यसेविका सौ.विना तोकल व सौ.विद्या कुमरे , आशावर्कर सौ.इंदुताई गणवीर , रोजगारसेवक रोशन दोनाडे, व सामाजिक कार्यकर्ते संजय आत्राम यांची उपस्थिती होती. पारडी ठवरे ग्रामपंचायत ने लसीकरणासाठी जनजागरण व पिण्याच्या पाणी सह सर्वपरीने मदत केली होती . भाजपाच्या वतीने यावेळी मास्क चे वितरण करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने