(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सद्यास्थितीत शहरात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार झालेली आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांतही या विषाणूचा प्रादुर्भाव होत असतांना दिसत आहे.
त्यामुळे ग्रामिण रुग्णालय पोंभूर्णा येथे असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये लहान मुलांकरीता स्वतंत्र कक्ष निर्माण करुन बालरोग तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरुन लहान मुलांकरीता योग्य उपचाराची उपलब्धता होईल. पोंभूर्णा कोविड केअर सेंटर येथे लहान मुलांकरीता स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्याची मागणी राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली.