पोंभूर्णा-चिंतलधाबा मार्गावर जंगली जनावरांमुळे अपघात होऊन नये यासाठी उपाययोजना करा:- जि. प. सदस्य राहुल संतोषवार.

Bhairav Diwase
वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना निवेदनाद्वारे केली मागणी.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा-चिंतलधाबा मार्गावर रानडुक्कर आणि अन्य प्राण्यांच्या धडकेत अनेक नागरिकांनी आपले प्राण गमवावे लागले. चेक आष्टा फाटा ते अगरबत्ती क्लस्टर पर्यंत मागील आठवड्यात रानडुकरांमुळे तिन अपघात होऊन जिवितहानी झाली आहे. सदर मार्ग हा रहदारीचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग तसेच शालेय विद्यार्थी, व इतर नागरीकांना ये-जा करावे लागते.
परंतू सदर मार्गावर जंगली रानडुक्कर आणि अन्य प्राण्यांच्या धडकेत अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. नागरीकांच्या जिवाला धोका होणार नाही त्याकरीता रस्त्याच्या कडेला प्रतिबंध घालून जंगली जनावर रस्त्यावर येणार नाही. याबाबत आपले स्तरावरुन बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणीीजिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना निवेदनाद्वारे केली आहे.