(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- कॉम्प्युटर सायन्समध्ये एम टेकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र, स्वतःचा व्यवसाय करण्याची आवड व शेतीकडची ओढ त्याला नोकरीत स्वस्त बसू दिले नाही.
अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडून शेतीसोबत दुग्ध व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी गाव गाठले. स्वतःच्या मेहनतीवर आणि दूरदृष्टीने या युवकाने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या उच्चविद्याविभूषित युवकाचे नाव आहे प्राध्यापक ऋषिकेश लोनगाडगे.
अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडून शेतीसोबत दुग्ध व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी गाव गाठले. स्वतःच्या मेहनतीवर आणि दूरदृष्टीने या युवकाने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या उच्चविद्याविभूषित युवकाचे नाव आहे प्राध्यापक ऋषिकेश लोनगाडगे.
ऋषिकेश लोनगाडगे हा राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बालपणापासून अभ्यासात तल्लख बुद्धिमत्ता होती. त्यामुळे बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे वळला. जळगाव येथे अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१३-१४ मध्ये नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवीत्तर एमटेक (कम्प्युटर सायन्स)पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर याच महाविद्यालयांमध्ये नोकरीला सुरुवात केली.
नागपूरसारख्या महानगरांमधील प्रसिद्ध कॉलेजमधील नोकरीत मात्र मन रमले नाही. गावाकडील काळी माती त्याला वारंवार खुणावत होती. बालपणापासून शेतीची आवड असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याची सुरुवातीपासून इच्छा होती. संगणक क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेवटी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले आणि पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे दूध पॅकेजिंगला सुरुवात केली. त्यानंतर मूळ गाव गोवरी येथे शेती असल्यामुळे गोपालन करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रजातीतील गाई खरेदी करून गोवरी येथे मितांश डेअरी फार्मची निर्मिती केली.
आजच्या मितीला १५ ते २० गाई डेअरी फार्ममध्ये आहेत. दररोज साधारणपणे दीडशे लिटर गाईचे शुद्ध ताजे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा उभी केलेली आहे. चंद्रपूर बल्लारपूर राजुरा शहरामध्ये सकाळीच गायीचे ताजे दूध घरपोच पोहोचवण्यात येते. यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून दिनक्रम सुरुवात होतो. गाईचे दूध काढताना यंत्राचे वापर केले जाते. गाईचे आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेण्यात येते.
आहार व त्यांचे आरोग्य जोपासण्यासाठी तसेच दुधाचे वितरण करण्यासाठी गावातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. स्वच्छता आणि शुद्धता याला प्राधान्य देऊन दुग्धव्यवसायात मितांश डेअरी फार्मचे सदस्य काम करीत आहेत. उच्चशिक्षित तरुणाने समाजाला दिलेला हा एक आदर्श आहे. स्वबळावर शेतीसोबत दुग्धव्यवसायाला चालना देऊन वेगळा मार्ग निर्माण केलेला आहे. या व्यवसायात ऋषिकेश लोनगाडगे याला पत्नी करिश्मा लोनगाडगे हिची मोलाची साथ आहे.
सुरुवातीपासून शेतीची आवड असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. कॉम्प्युटर सायन्समध्ये एमटेक केल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये नोकरी असताना सुद्धा माझे मन शेतीकडे होते. त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळलो. दूध पॅकेजिंगपासून आता स्वतःची डेरी फार्म निर्माण केलेला आहे. दररोज जवळपास दीडशे लिटर दूध ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. ग्राहकाला शुद्ध आणि ताजे गायीचे दूध मिळावे हा उद्देश ठेवूनच व्यवसाय सुरू आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रसामग्री उपलब्ध आहे.
ऋषिकेश लोनगाडगे
मितांश डेअरी फार्म, गोवरी