आरोपी पुतण्या हॉस्पिटलमधून झाला पसार.
अवघ्या काही तासांतच सिंदेवाही पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील गुंजेवाही येथे मारोती गोविंदा वाढई वय 65 याचा सोबत पुतण्या दिपक झिटुजी वाढई वय 40 घराच्या जागेसाठी कडाक्याचे भांडण चालू होतं भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आरोपी पुतण्या दिपक झिटुजी वाढई याने मृतक काका मारोती गोविंदा वाढई व त्याचा मुलगा सतीश मारोती वाढई (वय 37 ) यांच्यात काठीने हाणामारी झाली त्यात दोघेही जखमी झाले काका मारोती गोविंदा वाढई हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
आरोपी पुतण्या दिपक झिटुजी वाढई याचे कपाळावर मार लागल्याने तो ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचार घेत असताना त्याला काकाच्या मृत्यूची वार्ता कळताच ग्रामीण रुग्णालयातून पळ काढला त्याचा शोध घेण्याकरीता पोलीस पथक गुंजेवाही य़ेथे रवाना करुन काही साच्या आत आरोपीला अटक करून कलम 302, 324 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री मिलींद शिंदे सा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सिंदेवाही स.पो.नी योगेश घारे हे करीत आहेत.