जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🇮🇳

🇮🇳 🙏

🙏🏻

पाण्याची टाकी कोसळून मजूर ठार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मूल तालुक्यातील केळझर येथील नदीवर असलेल्या पाण्याची टाकी कोसळल्याने मोटर पंप लावण्यासाठी गेलेल्या पुंडलिक मराठे (२५) या मजूर युवकाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. मजुराच्या मृत्यूची वार्ता गावात कळताच, गावकरी घटनास्थळी गोळा झाले असून, जोपर्यंत मृतकाच्या वारसांना भरपाई दिली जात नाही तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याचे माहिती आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार, संवर्ग विकास अधिकारी यांनीही घटनास्थळी उपस्थित झाल्याची माहिती आहे.
मागील तीन-चार दिवसापासून केळझर येथील पाणीपुरवठा करणारे मोटर पंप बिघडल्याने हा पंप दुरुस्त करून आज ग्रामपंचायतच्या कर्मचारी पुंडलिक मराठे यांना सोबत घेऊन पंप लावण्याकरिता गेला. नालीचा उपसा करत असताना आधीच क्रॅक असलेली पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात पुंडलिक मराठे दबून जागीच ठार झाला. पुंडलिक मराठे याला दोन वर्षाचा एक आणि एक वर्षाचा एक असे दोन लहांनगे मुल असून, त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत