रामपूर ( राजुरा) येथील वारंवार खंडीत होणारे वीजपुरवठा सुरळीत करा

Bhairav Diwase
संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ऑफिसला निवेदन


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- रामपूर हे गाव राजुरा शहराला अगदी लागुन आहे गावात 5000-6000 लोकसंख्या आहे तरी या गावात वारंवार दिवस रात्र वीजपुरवठा खंडित होतो या भागात wcl कर्मचारी शिक्षक तसेच ईतर ही नागरीक असतात वारंवार खंडीत होणार वीजपुरवठ्या मुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.   परंतु या कडे लोकप्रतिनिधी ही लक्ष देत नाही त्यामुळे रामपूर येथील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेली संकल्प फाउंडेशन पुढाकार घेऊन सर्व सदस्यांनी निर्णय घेऊन महावितरण ऑफिस ला निवेदन देण्यात आले महावितरण ऑफिस ने पन यावर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती उपाययोजना करू व वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणार अशी ग्वाही दिली यावेळी संकल्प फाउंडेशन सुरज गव्हाने, उज्वल भाऊ शेंडे, ओमप्रकाश काळे, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, शुभम बोबडे, अक्षय डखरे, दिपक झाडे, गोलु दुपारे उपस्थित होते.