Click Here...👇👇👇

जुन्या वादातून "गँगवार"

Bhairav Diwase

चंद्रपूर:- येथून जवळच असलेल्या नकोडा गावात शनिवारला रात्री 11 वाजता दरम्यान गँगवारची घटना घडली.
आरोपी सुमेर सिंग संदीप सिंग बैस रा. आठवडी बाजार जवळ, नकोडा यांच्या साथीदारांनी अक्षय रत्ने हा घरा जवळ मित्रा सोबत बसून असतांना जुन्या वादातून भांडण केले.
सुमेर सिंग याने व त्याच्या साथीदारांनी अक्षय रत्ने यास जबर मारहाण केली त्यामुळे तो रक्ताच्या थोरड्यात पडला.
फिर्यादी कल्पना मारोती रत्ने यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारी वरून आरोपी विरुद्ध कलम 324 (34) गुन्हा दाखल करण्यात आला.
तर आधी आरोपी सर्रू ऊर्फ सर्फराज पटेल याने आपल्या साथीदारसह जुन्या वादातून फिर्यादी सुमेर सिंग संदीप सिंग बैस हा घरा जवळ उभा असतांना शिवीगाळ करून मारपीट केली. फिर्यादी सुमेर सिंग च्या तक्रारी वरून आरोपी सर्रू ऊर्फ सर्फराज पटेल यांच्या वर कलम 324, 448, 323, 504, 506 (34) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
काही वर्षांपूर्वी नकोडा येथे गँगवारने डोके वर काढले होते. परत आता पुन्हा एकदा गँगवारने डोके वर काढले आहे त्यामुळे नकोडा गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.