दारूसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- वणी तालुक्यातून देशी-विदेशी दारू घुग्घुसकडे येत असल्याच्या माहितीवरून वेकोली वणी हद्दीतील शास्त्रीनगर कामगार वसाहत दरम्यान पोलिसांनी सापळा रचून एका कारची झडती घेतली असता त्यात तीन लाख २० हजार रुपये किमतीची देशी- विदेशी दारू व ८० हजारांचे वाहन असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. फरार आरोपी सोनू सारसर व टक्कू यादव दोन्ही रा. शास्त्रीनगर, घुग्गुस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोधकार्य सुरू आहे.

वणी तालुक्यातून दारू घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घुग्घुसच्या वेकोलीच्या शास्त्रीनगर क्वार्टर नं. २३८ येथे सापळा रचून कार क्रमांक एमएच ३१ सिएन ०८२३ ला थांबवून तपासणी केली असता त्यात दारू आढळून आली.

वाहन चालक पोलीस दिसताच वाहन सोडून फरार झाला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गोखरे,गुन्हे शाखेचे सपोनि गौरीशंकर आमटे, महेंद्र वनकवार, मनोज धकाते, रंजित भुरसे, सचिन बोरकर व आडे यांनी केली.