हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द.

Bhairav Diwase
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचा आदेश.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- दिनांक.०६/०५/२०२१ चिमूर येथील वादग्रस्त ठरलेले हिलींग टच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा कोविड उपचार करण्याचा परवाना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रद्द केला असून तसे आदेश निर्गमित केले आहे. यापुढे कोणत्याही कोविड रुग्णाला इस्पितळात दाखल करू नये असे आदेशही बजावण्यात आले आहे.प्रशासनाची मान्यता न घेताच हे रुग्णालय सुरू केल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशात ठेवला आहे.कोणत्याही रुग्णांकडून ऍडव्हान्स रक्कम घेऊ नये असे स्पष्ट आदेश आरोग्य मंत्र्यांचे असतानाही चिमूर येथील राजाश्रय मिळविलेल्या हिलींग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये खुलेआम रुग्णांची लूट केल्या जात होती, रुग्णांकडून ॲडव्हान्स घेतल्याशिवाय उपचार केले जात नव्हते, रुग्णांचे नावे जाहीर करून शासनाचे आदेशाचे भंग केले जात होते. यासह अनेक तक्रारी या रुग्णालयाच्या बाबतीत. व या हॉस्पिटल च्या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकारांनी बातम्या प्रकाशित केले असता त्यांनाही मारहाण या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून केल्या गेली होती.


चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खुलेआम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून दारातच घेतले जात होते २ लाख रुपये व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करून रुग्ण मारले जात असता. या हॉस्पिटलला नॉर्मल रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी ( DCHC ) या नावाने दिली गेलेली असून सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर या हॉस्पिटलमध्ये घेतले जात होते. आणि रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांना मारले जात होते. तसेच एकाच दिवशी २० ओ टू सिलेंडर तर दोन दिवसात एका रुग्णाला २५ सिलेंडर लावली जातात हा सर्व प्रकार आमदारांच्या व जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून अशा प्रकारच्या ट्रेटमेंट रुग्णांवर केल्याने रुग्ण वाचेल कि मरेल असा स्थानिकांचा मत होता याचबरोबर या रुग्णालयावर कारवाई करून रुग्णालयाला सिल ठोकून बंद करून हॉस्पिटल मध्ये मृत रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारार्थ घेतलेली लाखो रुपये फि परत करण्यात यावे व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना मृत रुग्णांचे भावंड शिवम सोरदे शांतिभूषण सोरदे तसेच भारतीय क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष डार्विन कोब्रा व उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर , कैलास भोयर यांनी केली असता लवकरात लवकर या हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई व चौकशी करण्यास अधिकारी यांना सांगितले होते. आणि कारवाई होणार असे आमदारांनी आश्वासन दिले होते. व दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करीत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सर्व पळताळणी करून या अनाधिकृत पध्दतीने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला देण्यात आलेली ( DCHC ) ची मान्यता रद्द करण्यात आली असा अहवाल दिला.व या उलट दिनांक.०६/०५/२०२१ पासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण घेतल्यास साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अनवये कारवाई करण्यात येईल असा आदेश जाहीर करण्यात आला आहे.