चंद्रपूर शहरातील जनतेला मुबलक पाणी द्या!

Bhairav Diwase
आज यंग चांदा ब्रिगेडचा चंद्रपूर महानगरपालिकेवर मोर्चा.
Bhairav Diwase.    May 31, 2021
चंद्रपूर:- उन्हाळ्यात चंद्रपूर शहरातील पाणी टंचाईने वातावरण चांगलंच तापलं असून सध्या एक दिवसआड शहरात पाणी पुरवठा होत आहे. कोट्यवधी रुपयांची अमृत योजना आज वेळेच्या आत पूर्ण न झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.
    मात्र अधेमध्ये इराई धरणातून शहरात येणारी जलवाहिनी फुटल्याने 1 ते 2 दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही.
नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार 31 मे सोमवारी दुपारी 3:00 वाजता शहरातील नागरिकांना मुबलक पाणी देण्याची मागणी करीत महानगरपालिका चंद्रपूर वर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    मोर्चाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले असून मोर्चाचे नेतृत्व आमदार किशोर जोरगेवार करणार आहे, शहरातील नागरिकांनी मोर्च्यात उपस्थित रहावे असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.