Top News

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आक्सापुर व कोविड केअर सेंटरला हल्दी दुध, अंडी, बिस्कीट व मास्क वाटप.


पंचायत समिती सदस्या सौ. भुमी पिपरे यांच्या हस्ते.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- देशातील सर्वात सशक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील सरकारला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतावर कोरोना चे भयानक संकट आलेले असतांना आज केंद्र सरकार ताकतीने लढत आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आपले योगदान समाज सेवेसाठी देत आहे.

केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम यांच्या आदेशानुसार पंचायत समिती सदस्या सौ. भुमी पिपरे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आक्सापुर व कोविड केअर सेंटरला हल्दी दुध अंडी आणि बिस्कीट व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सौ. स्वाती वडपल्लीवार, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष जांभुडकर, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने