(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- देशातील सर्वात सशक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील सरकारला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतावर कोरोना चे भयानक संकट आलेले असतांना आज केंद्र सरकार ताकतीने लढत आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आपले योगदान समाज सेवेसाठी देत आहे.
केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या सौ. स्वाती वडपल्लीवार यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र करंजी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आक्सापुर व विलगिकरण कक्ष धानापुर येथे हल्दी दुध, अंडी, बिस्कीट व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा पंचायत समिती सदस्या सौ भुमी पिपरे उपस्थित होते.