उपचारादरम्यान नागपूर येथिल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
चंद्रपूर:- शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मानद सचिव प्रभाकर दिवे ह्यांचे आज नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
दिनांक 14 मे रोजी त्यांच्या कारचा अपघात झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. राजुरा गडचांदूर दरम्यान थुटरा गावानजीक असलेल्या पेट्रोल पंपावरून निघालेल्या एका ट्रक ला प्रभाकर दिवे स्वतः चालवत असलेल्या कारने जोरदार धडक दिली होती. ह्या संदर्भातील बातमी केवळ चांदा ब्लास्ट ने प्रकाशित केली होती ही विशेष.
ह्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले होते. त्यांच्या मेंदूचे एम आर आय केल्यानंतर त्यांना झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने नंतर त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले.
आज त्यांची मृत्यु सोबत 18 दिवस सुरू असलेली झुंज अखेर संपली असुन त्यांच्या जाण्याने केवळ शेतकरी संघटनाच नाही तर राजकीय क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.