💻

💻

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कार्य करणारा खरा कोरोना योद्धा- माजी आमदार अँड संजय धोटे corona

प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा राजुरा तर्फे कोरोना योद्धाचा सत्कार.

आरोग्य सेवा सप्ताह दिन म्हणून साजरा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र जनतेची सेवा देत आपले कार्य नियमित पणे करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव,सफाई कर्मचारी,खरे कोरोना योद्धा असल्याचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मटले आहे,भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे राजुरा नगर परिषद येथील आरोग्य विभागाचे सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य सेवा सप्ताह दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा अंतिम संस्कर करणारे सफाई कर्मचारी यांनी आपली निरंतर सेवा देत आपले कर्तव्य पार पाडत कार्य केले. अश्या वेक्तीचा माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या पुढाकाराने शाल, शिफाळ व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला,. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर हेही प्रामुख्याने उपस्थित होते.


प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी अनेक योजना राबवित कार्य करीत आहे,अशेच कार्य करण्याचा संकल्प करीत भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे गरजू लोकांना सहकार्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे,यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत केंद्रातील मोदीजी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा जिल्हा सचिव हरिदास झाडे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य संजय उपगनलावार, भाजप तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजप नेते महादेव तपासे, सुरेश रागीट, मंगेश श्रीराम, गणेश रेकलवार, जनार्धन निकोडे, रत्नाकर पायपरे, कैलास कार्लेकर, प्रशांत साळवे, संदीप मडावी, आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत