(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- सुरेश परचाके (५०) रा. जेना असे मृतकाचे नाव आहे तर यातील बबन परचाके (६०),शरद परचाके (४०) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी व मृतक हे नातेवाईक असून दोघेही शेजारी राहतात. दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व करत असून ग्रामपंचायत येथे झालेल्या आर्थिक कारभाराबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. घटनेच्या दिवशी असाच प्रकार घडल्याने वडील व मुलाने सुरेश परचाके यास धक्काबुक्की केली. यात सुरेश हा खाली पडला.
त्यानंतर त्याला घरच्या लोकांनी घरी नेले व तो चहा पीत असताना त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.